. चित्रपट हा मानवी भावना आणि समाज यांना एका नात्यात बांधतो . समाजची सांस्कृतिक देवाण घेवाण यात चित्रपट हे महत्वाची भूमिका पार पाडतात .या चित्रपट महोत्सवाचा हा थोडक्यात इतिहास ……
- इफ्फी २०१३ ४४ वे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, गोवा
१९५२ पासून या आंतरराष्ट्रीय फ़्लिम फेस्टिवल ची सुरुवात झाली . २००४ पासून हा महोत्सव गोव्यात हा महोत्सव २० ते ३० नोव्हेंबर या दरम्यान आयोजीत करण्यात येतो.यावर्षी हा गोव्यातील १० वा महोत्सव पार पडला . या महोत्सवात देशी विदेशी चित्रपटाचे निर्माते ,दिग्दर्शक ,कलाकार तत्राद्य ,समीक्षक ,अभ्यासक ,फ़्लिम स्कूल मधील विद्यथ्रि,व अनेक व्यक्ती यांना हे चित्रपट पाहण्यास मिळाले.
या महोत्सवाला मानवी भावभावनांना स्थान होते या वर्षात तसेच या आदीपासून इफ्फी ह्या महोत्सवामुळे ,मानवी भावभावनांचे तरल व सौम्य चित्रण करणारे चित्रपट सर्व व्यक्तीना पाहण्यास मिळाले इफ्फी या मार्फत प्रादेशिक चित्रपटाना भरपूर प्रतिसाद मिळण्यास व्याजपीठ निर्माण झाले या महोत्सवाच्या प्रत्येक वर्षाचे महत्त्व म्हणजे चित्रपट सृष्टीत असणारे कलाकार व गुणवत्ता याची भर हिच होय.
१९७८पासुन इंडियन पॉनोरम हा विशेष विभाग यात प्रादेशिक चित्रपटाना प्रोहोत्सन देण्यासाठी केला होता
२०१३ चे महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या श…. गर्ल्स डोन्ट स्क्रीम (ईराण ),लाईक फादर लाईक सन (जपान), वेटिंग विथ अ यंग पोऐट (इंग्रजी) ,एन हायडीग (हॉलंड) अशा अनेक चित्रपटाना प्रसिद्धी मिळाली
श…. गर्ल्स डोन्ट स्क्रीम मध्ये लहान मुलींवर लैगिक अत्याचाराची कहाणी मद्न्यत आली आहे तसेच आयाम अ डिरेक्टर हे सर्वच चित्रपट प्रेक्षकांची प्रेक्षकांची अभिरुची संपन्न करणारे होते. दरवर्षी सारखे ह्यावेळेसचे चित्रपट अधिक भावभावनांची गुंफण अंनि सामाजी आशय मांडणारे होते .
मिफ्फ फेस्टिवल
हा महोत्सव माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मार्फत राबविला जातो मिफ्फ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकृत महोत्सव आहे हा महोत्सव सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात होतो . यावर्षी १३ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव चालला असून या महोत्सवला १७ वर्षे पूर्ण झाले.
मिफ्फ ह्या महोत्सवात वर्क्शाप ,मास्टर क्लास इत्यादी विभाग असून या मार्फत एक पूर्णपणे वेगळी स्पर्धा निर्माण करणारे व्याजपीठ निर्माण केले आहे. १९१८ मिफ्फ हे माहितीपटासाठी दर्जेदारव्याजपीठ आहे. ह्या चित्रपट महोत्सवात ४५-५५ देश सहभागी होतात . यात माहिती चित्रपट निर्माते व्ही. शांताराम लाइफटाईम अचीव्हमेंट आवार्ड दिला जातो ज्याची किंमत ५ लाख असते . आजपावेतो १२ मिफ्फ आयोजित झाले . मुंबईत नरिमन पोइंत येथे २०१३ चे मिफ्फ पार पडले . २०१२ मध्ये एकूण भारतीय ५६७स्पर्धक सहभागी झाले होते तर २२४ आंतरराष्ट्रीय विभागासाठी सहभागी झाले होते यावरून असेच लक्षात येते कि दिवसेंदिवस मिफ्फ हे सर्व चित्रपट आणि कलाकार यांच्या यशस्वी भूमिकां उत्तेजन देण्यासाठी कार्यरत आहेत. विचार आदानप्रदाणासाठी चालवलेली हे व्याजपीठ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यातून मिळत आहे . २०१२ मध्ये मिके पांडे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. १९९६ मध्ये मिफ्फ चे शुभारंभ झाला तेव्हा त्याचे पाहीला सर्वोत्क्रुट चित्रपट म्हणून सोनमति - अ व्हेरी ऑर्डनरी स्टोरी या चित्रपटाला मिळाला तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एम . एस. सेन्शो सिंग याला सन्मान मिळाला .
- पिफ्फ फेस्टिवल
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा दि. ९ ते १६ जानेवारी या शुभदिनी होतो.हा महोत्सव २००२ साली सुरु झाला . प्राथमिक चित्रपट शाळा आणि नशनल फ़्लिम अर्कीव ऑफ इंडिया (NFAI ) हे पुण्यात असून हा अभूतपूर्ण मेळाव आहे व या दोन्ही चित्रपटाशी असलेलेया निगडीत संस्थां यासाठी पिफ्फ हा महोत्सव महत्वाचा ठरतो .
२०१४ साली १२ वे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला . यात अनेक चित्रपट स्पर्धेत गेतल्या गेले . त्यातलेच काही ७२ मैल प्रवास ,त्यामुळे भेट ,maunraag ,नारबाची वाडी , रेगे, पत्र,ब्लाक ओ व्हाईट ,आईकैडी फकीर यात्रा अशी अनेक चित्रपटाची नावे स्पर्धेत आली .
२००२ मध्ये सुरु झालेला हा फ़्लिम फेस्टिवलआजपावेतो अधिकाधिक नव्या गोष्टीची व चित्रपट कल्पनांची मुहुतमेढ रोवणारा ठरला . या चित्रपट स्प्रधेत विधार्थयांची देखील चित्रपट स्पर्धा आयोजली जाते यात सर्वोत्कृट चित्रपट मानून १००० डॉलर दिले जाते ,तसेच सर्वोत्कृट दिग्दर्शक , बेस्ट पटकथा , सर्वोत्कृट चलचित्रनिर्माता ,सर्वोत्कृट ऑडीओग्राफर , बेस्ट अनिमेशन चित्रपट आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे बक्षीस दिले जाते . पुणे २०१४ चे अध्यक्ष व संचालक डॉ . जब्बार पटेल उपाध्यक्ष सबिना सांगावी कार्यक्रम संचालक श्रीनिवास सन्थनम हे होते २०१३ मध्ये या महोत्सवाचे काक स्पर्श शिफारशीस आहे . २०१४ मध्ये संत तुकाराम यास बेस्टआंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले.
पूजा रामराव डोम


