Tuesday, 11 March 2014

नारीशक्ती जगाचा भविष्यकाळ

                                      नारीशक्ती  जगाचा  भविष्यकाळ 
                               

                                           ८ मार्च एक दिवस ज्या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो . जागतिक महिला दिननिमित्ताने वर्तमान पत्र हातात घेताच उज्ज्वल ध्येय कठीण परिश्रमातून साध्य केलेल्या महिलांच्या प्रतिमा ,त्यांचे लेख ,आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचा प्रसंग अगदी योग्य रीतीने छापून आला वर्तमानपत्र हाती  अधाशी सारखे  त्यांचे परिस्थितीच्या संघर्षाचे,समाजाने दिलेल्या हीनतेच्या वागणुकीचे,स्त्री तत्वाचा अनादर  तसेच  कमी समजण्याचे कित्येक प्रसंग वाचले. मात्र (मी स्त्री ला नारीशक्ती असे संबोध करीत आहे . ) नारीशाक्तीने प्रत्येक प्रसंगावर हिम्मतीने आणि बुद्धीच्या बळाने कसे जिंकले याचे अभूत पूर्ण वर्णन वर्तमानपत्रात दिसले खरचं ………. नारीशक्ती किती बलवान हि भवना मनात अत्यंत रूढ होऊ लागली . आज महिला प्रगतीच्या उंबरठ्यावर अहे. प्रगती साधत आहे . मात्र एक प्रश्न  पडतो  कि
 खरचं  नारीशाक्तीने पूर्ण प्रगती साधली आहे का ?
पूर्ण नारीशाक्तीचा उद्धार झाला आहे का ?

                                    पूर्ण नारीशाक्तीचा उद्धार करण्यासाठी त्यांना  आदर्श म्हणून आपण वर्तमानपत्रात असिड हल्याची शिकार बनलेली लक्ष्मी अगरवाल ,रिझर्व बँकेच्या डेप्युटी गवर्नर उषा थोरात इत्यादी इत्यादी … अडचणींवर  मात करून जगाला आदर्श उभा करून देणाऱ्या  नारीशाक्तीचा उल्लेख सर्वच ठिकाणी आढलताना दिसतो त्याचा तुम्ही आढावा घेतलाच असेल अशी अपेक्षा …… महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम ,  सभा,अंक आणि टीव्ही तील चर्चा बनलेल्या नारीशाक्तीब्द्दल आपणास जाणवते . एका दिवसाला आपण जागतिक महिला दिन म्हणून त्याच दिवशी त्याच्याबद्दल वर्तमानपत्राचे लेख , कार्यक्रम, चर्चा , आणि सभा यांचे आयोजन करणे ठीक नव्हे .

                         नारीशाक्तीचा  खरच उधार करायचा असेल तर नक्कीच प्रत्येक दिवस आपण नारीबद्दल चांगल्या विचारांचा , आदराचा ,महिलाबाद्द्ल जाणीवेचा त्यांना शिक्षित करण्याचा , त्यांना चार लोकांत भय न वाटू देण्याचा , त्यांना  उत्तेजन देण्याचा आणि  एक समानतेचा नी आपुलकीचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी प्रत्येकानी मनापासून प्रयत्न करावयास हवे .म्हणूनच आपण प्रत्येक दिवस नारीचा किती आदर करतो आणि त्यांना कितपत समजतो हेस महत्त्वाचे ठरते .
                       आजही महिलांना कनिष्ट पातळीवरचे राहणीमान सहन करावे लागते आजही महिला अत्याचाराला तोंड देत जीवन जगतात ,आजही महिला स्त्री भ्रूण हत्येकडे झुकल्या जातात , आणि आजही महिला पूर्ण पाने अंधश्रद्धेच्या आहारी जातात . हि फार क्लेशकारक दुख द घटना आहे . अत्याचार ,बलात्कार आणि स्त्री भ्रूण हत्या ह्या गोष्टीडोळ्यांसमोरून  ढळता ढळत नाही . आजही महिला पूर्ण पाने साक्षर नाही . सरकारने तर साक्षरतेची व्याख्या ठरविली आहे कि ज्यांना लिहिता वाचता येते ते साक्षर आणि त्यात महिलांचे प्रमाण देखील जास्त आहे . आज समाजाला डोळ्यांची झापड काढून पहिले तर दिसते आज शिक्षण म्हणजे तंत्रज्ञान आहे . नारी शक्तीला या तंत्रज्ञानाचे किती ज्ञान आहे ते तुम्हा आम्हा माहिती असेलच
                   नारीशक्तीचा  उद्धार हा फक्त एकाच दिवसापुरता नसून हि  समांतर चालणारी प्रक्रिया आहे . फक्त एकाच दिवस गाजावाजा करून स्त्री शक्ती सबला बनु शकत नाही . आजहि महिला एकटे फिरण्यास घाबरते असुरक्षितता आजही सतावत आहे . आजही गाव पातळीवर लक्ष देऊन बघितले असता १० वी १२ शिकण झाले असता मुलीचे लग्न होते उच्च विद्या विभूषित होणे काय  गरजचे लग्न झाल्यावर भाकरीच थापायच्या असा टोलाही नारीशक्ती शिक्षणाचा आग्रह करतांना  मारला जातो  पण काही अशी देखील कुटुंबे आहेत कि ते आपल्या  मुलीस उच्चविद्याविभूषित होण्यास पाठीवर ध्यार्याचा हात ठेवतात मात्र ह्यांचे प्रमाण कमी आहे
                    स्त्री जाणीवेचा विचार करतांना कुटुंबात नारीशक्ती असतेच मग ती आई ,बहीण ,मावशी ,काकी, इत्यादी यांच्याकडे आपण समानतेच्या पातळीवर बघितले सात आपपल्या स्वतःलाच लाज वाटते . आजही आपण बहिणीला भावाचा दर्जा देत नाही . आईस वडिलांबरोबर स्थान देत नाही . पुरुषप्रधान संस्कृतीचा नारा गाजवणारे आपण येथे स्त्री शक्तीचा गारा थंडावितो . स्त्री यांना पूर्णपणे मत स्वातंत्र देखील देण्यास आपण घाबरतो . समानतेच्या पातळीवर आपण भाष्य करतांना वाळूत  खुपसण्याऐवजी आपणास पर्याय उरत नाही .
                लक्षात ठेवा . …आज महिला स्वतंत्रास ,राजकीय कारभारास संधी न दिल्यामुळेच मागे राहतात .
नारीशक्ती चा उद्धार खरचं आणि मनापासून करायचा असल्यास आज एक शपथ घेऊया कि आजपासून महिलांशी आदरपूर्वक वागणार . मग त्यात काही महिलांचा देखिल समावेश होतो . करणा काही महिला स्वताच जातीभेद मानून 'ती कमी जातीची -उच्च जातीची असे म्हणून तोंड भरवत असतात . आज शिक्षित महिला अशिक्षित महिलाच अनादर करताना दिसतात हे योग्य नाही . आणि जर त्या महिलेलेने खरंच  शिक्षणाचे महत्त्व कळाले असल्यास ती अस करणार नाही . शिक्षण हे विनायानेच शोभते हे लक्षात घेऊन न शिकलेल्यांना देखील साक्षर करण्याचे ध्येय उरी बाळगण्यास हवे . महिलांनी अशिक्षितान प्रोत्साहन देण्यास हवे . उत्तेजन देण्यास हवे .
            आणि समाजाने म्हीलास प्रतिष्ठतेचे स्थान द्यावयास हवे . एक संधी तर नारीशक्तीला   देऊन बघा संधीचे सोने होईलच . नारी शक्ती बद्दल एक संस्कृत मधील शोल्क आठवतो " यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवता "
जेथे स्त्रीयांचा आदर होतो तेहे देवही अस्तित्व दाखवितो . म्हणून आज जागतिक महीला दिनानिमित्त सर्व नारी शक्तीला माझा त्रिवार नमस्कार …. !
                                     
                         स्त्री विषयी काही ओळी 
   
              आजच्या जगात जन्मलेली स्त्री दुर्बल नाही .
              अन्यायाच्या प्रतिकारासाठी स्त्री सज्ज आहे .
              अन्याय करणाऱ्या विरुद्ध भैरवी देखील                                   होणारी आहे .
              तेजस्वी शक्ती देवता ती आहे .
              अहिंसेचा मार्ग सर्वाना दाखउन मंगलकारी                 आहे .
              जगात शांततेचा प्रसार करणारी स्त्री च आहे . …
            
                        स्त्री  भ्रूण हत्येविषयी 

                स्त्री  च्या कार्यास गती द्या , तिला यमसदनी पाठउ  नका






                           
                    



Wednesday, 5 March 2014

युवक : देशाचे आधारस्तंभ

                                        युवक : देशाचे आधारस्तंभ   

                                      युवक , युवक हे देशाचे  आधारस्तंभ असतात एखाद्या देशाचे भविष्य जाणून घ्यायाचे असेल तर त्या देशातील युवकांच्या ओठी  कोणते गाणे आहे यावरून समजते असे थोर व्यक्तिमत्त्वाने सांगितलेले आहे . राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य करण्याचे सामर्थ्य युवकांना लाभलेले आहे. राष्टृ उभारणी हे कार्य  समर्थपणे पार पडायचे असल्यास प्रत्येक देशाला युवाला हाती घ्यावे लागतेच . त्यामुळेच युवकांच्या समस्या जाणून घेणे  गरजेचे ठरते ,युवकांचे राष्ट्रात योगदान हवे असल्यास त्यांच्या पुढील समस्या कोणत्या आहे हे प्रथमत : जाणून घाव्या लागतात . कारण आपल्या शब्दाला वजन आहे आपल्याला अधिकार आहे हे पूर्णपणे युवकांना जाणविल्यावारच ते राष्ट्राची जबाबदारी उचलण्यास पुढे  येतात . युवकांची मानसिकता समजण्यासाठी जुनी पिढी आणि युवा पिढी यांच्यातील अंतर दोन्हीकडून कमी करून एकात्म चित्र बदल्ण्याची गरज भासू लागते .  

                                    युवा पिढीचा  समाजसेवांच्या माध्यमातून विकास साधण्याचे उदिष्ट समोर ठेऊन  राष्ट्रीय सेवा योजना राबविण्यात आली ती म्हणजे १९६९ रोजी गांधींच्या जन्मशताब्दीच्या दिवशी . 
 राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय  एकत्माकेची भावना , विधात्मक व श्रमाच्या  प्रतीष्टा
  महत्त्वाची जाणीव करून देणे , विद्यानर्थांच्या प्रत्यक्ष कार्याच्या माधमातून सामुदायिक आप्पातींशी प्रत्यक्ष सामना करण्याची क्षमता निर्माण करणे असे अनेक उदिष्टे  राष्ट्रीय सेवा  योजनेतून स्पष्ट होताना दिसतात . 
                                   मात्र हि उदिष्टे पूर्णपणे  यशस्वी होत आहेत असे म्हणणे स्भायापांचे नसेल, महाविधयालातील NSS  कॅम्प वाटते तितके पूर्ण उदिष्ट साध्य करणारे ठरत नाहीत . तरी ते त्या मानाने खारीचा वाट उचलत आहेत यात कदापि शंका  नाही . 
                                 भारत सरकारने २००३ साली युवकांची व्याख्या १३ ते ३५ वयोगटातील व्यक्तीना युवक मानण्यात आले आहे,त्यांना युवकांचा दर्जा दिला आहे . 
मात्र युवकांची फक्त व्याख्या ठरवून चालत नाही तर ते कोणत्या समस्य्तून जात आहे यांची माहिती आणी त्यांच्या उपाययोजना भारत सरकारने राबविण्याचा प्रयत्न केला आहे . 
मात्र २० शतकात देखील भारत बेकारी ,गरिबी,भ्रष्टाचार ,शिक्षणाचे व्यापारीकरण (बाजारीकरण म्हणणे योग्य ठरेल ,अश्या सम्सास्याशी झुझतांना  दिसतात . 
                            युवक शिक्षित तर   सोडा, उच्चशिक्षित असला तरी त्याला बेकारीच्या अवस्थेला बळी पडावे लागत आहे यात शिक्षण व्यवस्थेचा, दोष आहे कि, पोपटपंची करणाऱ्या  विद्यानर्थांचा आहे . यावर विचार करावा लागतो . यातूनच जे उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन देखील बेकारीची अवस्था त्यांच्यावर येते ते त्यांच्या शक्तीचा वापर विघात्मक व विध्वंसक कार्यासाठी करतात . 
                          आज आपल्या देशात जात , धर्म , प्रदेश , यांच्या नावाखाली संकुचित विचार पसरविनार्या अनेक संघटना स्थापन झालेल्या आहे याच संघटनांना आजचा बेकार तरुण बळी पडतो .  आणि  ते स्वाभाविक आहे . त्याचप्रमाणे शिक्षणाचे होणे बाजारीकरण हि समाजाच्या युवकांची मुख्य समस्या आहे . ,शिक्षण संस्था स्थापन करणे हा झटपट पैसा मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे  आहे माननार्या शिक्षण महर्षींची नवी पिढी आता उदयाला येत आहे . उच्च शिक्षण हे मुठभर श्रीमांचीच मक्तेदारी बनत चालली आहे . 
                         त्यातच युवकांची ढासळत चाललेली वैचारिक पटली पाशयात्या जीवनपद्तीचे होनारे आक्रमण ,नैतिक मूल्याचा होणारा र्हास , सहज सहजी हाती येणारा पैसा , चैनी  जीवनाचे आकर्षण ,इत्यादी कारणांमुळे या वृत्ती मुले आजचा युवा पैसा हेक सर्वस्व याचकडे झुकू लागला आहे . या वृत्तीला बांध  घालण्यासाठी ``युवक धोरण २००३``मध्ये राबविण्यात आले , त्यात राष्ट्रीय सुरक्षा , राष्ट्रभिमान ,सामाजिक न्याय , अहिंसा ,सुरक्षा , हि मूल्ये यांविषयी युवकांच्या मनात आदर निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला गेला  युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इतर बाबतीत मार्गदर्शन मिळावे याकरता त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण या धोरणात सुरु झाले . 
युवकांच्या नाबत अंतरराष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावणे, नेतृत्व गुणांचा विकास करणे, लोकशाही मूल्ये, व धर्मानिरपेक्षतेचे तत्व यांचे महत्व युवकांच्या मनावर बिंबवणे यांचा एका प्रयत्न केला गेला . 
 राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दोन कार्ये येतात 
१)  नेहमीची कार्ये 
२) विशेष शिबिरीची कार्ये 
या पहिल्या टप्प्यात विदर्थ्याना स्वयं सेवक  म्हणून २ वर्षे कार्य करावे लागते . 
                            या योजनेत प्रत्येक वर्षी १२० तास किमान समाजसेवांच्या कार्यात सहभागी व्हावे लागते  विधात्मक व रचनात्मक कार्याचा अंतर्भाव होतो १० दिवसांच्या  कालावधीचे वर्षातील शिबीर सध्या १९८ विद्यापीठे आणि  ४३ वरिष्ठ माधामिक मंडळे  यांमधील २६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले आहेत . आणि  त्यांची संख्या  आता वाढतच चालली आहे , यात आनंदाचीच गोष्ट  आहे .                  
                       प्रगती करणे आणि  त्यासाठी मेहनत करणे हा मूळ  माणसाचा स्वभाव आहे . यातून नक्कीच भारत पुढे जाईल, आणि  प्रगतीच्या दिशेने   ही  एक वाटचाल आहे यात हे निश्चितच ……… । 

पूजा रामराव डोम
पत्रकारिता आणि जनसंपर्क 
विद्यार्थी। 
                                      

Thursday, 13 February 2014





. चित्रपट हा मानवी भावना आणि समाज यांना एका नात्यात बांधतो . समाजची सांस्कृतिक देवाण  घेवाण यात चित्रपट हे महत्वाची भूमिका पार पाडतात .या चित्रपट महोत्सवाचा हा थोडक्यात इतिहास ……  




  1. इफ्फी २०१३ ४४ वे  आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, गोवा

                                    १९५२  पासून या आंतरराष्ट्रीय फ़्लिम फेस्टिवल ची सुरुवात झाली . २००४ पासून हा महोत्सव  गोव्यात   हा महोत्सव २० ते ३० नोव्हेंबर या दरम्यान आयोजीत करण्यात येतो.यावर्षी  हा गोव्यातील १० वा  महोत्सव  पार पडला . या महोत्सवात देशी विदेशी  चित्रपटाचे निर्माते ,दिग्दर्शक ,कलाकार तत्राद्य ,समीक्षक ,अभ्यासक ,फ़्लिम स्कूल मधील विद्यथ्रि,व अनेक व्यक्ती  यांना हे चित्रपट पाहण्यास मिळाले.
    या महोत्सवाला मानवी  भावभावनांना  स्थान होते या वर्षात तसेच या आदीपासून इफ्फी ह्या महोत्सवामुळे ,मानवी भावभावनांचे तरल व सौम्य चित्रण करणारे चित्रपट सर्व व्यक्तीना पाहण्यास मिळाले इफ्फी या मार्फत प्रादेशिक चित्रपटाना भरपूर प्रतिसाद  मिळण्यास व्याजपीठ निर्माण झाले या महोत्सवाच्या प्रत्येक वर्षाचे महत्त्व म्हणजे चित्रपट सृष्टीत असणारे कलाकार व गुणवत्ता याची भर हिच होय.
१९७८पासुन  इंडियन  पॉनोरम हा विशेष विभाग यात प्रादेशिक  चित्रपटाना  प्रोहोत्सन देण्यासाठी   केला होता
                                   २०१३ चे महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या श…. गर्ल्स डोन्ट स्क्रीम (ईराण ),लाईक फादर लाईक सन (जपान), वेटिंग विथ अ यंग पोऐट (इंग्रजी) ,एन हायडीग (हॉलंड) अशा अनेक चित्रपटाना प्रसिद्धी मिळाली
  श…. गर्ल्स डोन्ट स्क्रीम मध्ये लहान मुलींवर लैगिक अत्याचाराची  कहाणी मद्न्यत आली आहे तसेच आयाम अ डिरेक्टर हे सर्वच चित्रपट प्रेक्षकांची प्रेक्षकांची अभिरुची संपन्न करणारे होते. दरवर्षी सारखे ह्यावेळेसचे चित्रपट अधिक भावभावनांची गुंफण अंनि सामाजी आशय मांडणारे होते .


                मिफ्फ फेस्टिवल
                                            हा महोत्सव माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मार्फत राबविला जातो मिफ्फ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकृत महोत्सव आहे हा महोत्सव सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात होतो .  यावर्षी १३ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव चालला असून या महोत्सवला  १७ वर्षे पूर्ण झाले.
                          मिफ्फ ह्या महोत्सवात वर्क्शाप ,मास्टर क्लास इत्यादी विभाग असून या मार्फत एक पूर्णपणे वेगळी स्पर्धा निर्माण करणारे व्याजपीठ निर्माण केले आहे. १९१८ मिफ्फ हे माहितीपटासाठी दर्जेदार
 व्याजपीठ  आहे. ह्या चित्रपट महोत्सवात ४५-५५ देश सहभागी होतात . यात माहिती चित्रपट निर्माते व्ही. शांताराम लाइफटाईम अचीव्हमेंट आवार्ड दिला जातो ज्याची किंमत ५ लाख असते . आजपावेतो १२ मिफ्फ आयोजित झाले . मुंबईत नरिमन पोइंत येथे २०१३ चे मिफ्फ पार पडले . २०१२ मध्ये एकूण भारतीय ५६७स्पर्धक सहभागी झाले होते तर २२४  आंतरराष्ट्रीय  विभागासाठी सहभागी झाले होते यावरून असेच लक्षात येते कि दिवसेंदिवस मिफ्फ हे सर्व चित्रपट  आणि कलाकार यांच्या यशस्वी भूमिकां उत्तेजन देण्यासाठी कार्यरत आहेत. विचार आदानप्रदाणासाठी चालवलेली हे व्याजपीठ मुंबई  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यातून मिळत आहे . २०१२ मध्ये मिके पांडे यांना उत्कृष्ट  दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. १९९६ मध्ये मिफ्फ चे शुभारंभ झाला तेव्हा त्याचे पाहीला  सर्वोत्क्रुट चित्रपट म्हणून सोनमति - अ व्हेरी ऑर्डनरी  स्टोरी या चित्रपटाला मिळाला तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एम . एस. सेन्शो सिंग याला सन्मान मिळाला .


  1. पिफ्फ फेस्टिवल 

                       पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  हा दि. ९ ते १६ जानेवारी या शुभदिनी होतो.हा महोत्सव २००२ साली सुरु झाला . प्राथमिक चित्रपट शाळा आणि नशनल फ़्लिम अर्कीव ऑफ इंडिया (NFAI ) हे पुण्यात असून हा अभूतपूर्ण मेळाव आहे व या दोन्ही चित्रपटाशी असलेलेया निगडीत  संस्थां यासाठी पिफ्फ हा महोत्सव महत्वाचा ठरतो .
२०१४ साली १२ वे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला . यात अनेक चित्रपट स्पर्धेत गेतल्या गेले . त्यातलेच काही ७२ मैल प्रवास ,त्यामुळे भेट ,maunraag ,नारबाची वाडी , रेगे, पत्र,ब्लाक ओ व्हाईट ,आईकैडी फकीर यात्रा अशी अनेक चित्रपटाची  नावे स्पर्धेत आली .
                      २००२ मध्ये सुरु झालेला हा फ़्लिम फेस्टिवलआजपावेतो अधिकाधिक नव्या गोष्टीची व चित्रपट कल्पनांची मुहुतमेढ रोवणारा ठरला . या चित्रपट स्प्रधेत विधार्थयांची देखील चित्रपट स्पर्धा  आयोजली जाते यात सर्वोत्कृट  चित्रपट मानून १००० डॉलर दिले जाते ,तसेच सर्वोत्कृट दिग्दर्शक , बेस्ट पटकथा , सर्वोत्कृट  चलचित्रनिर्माता ,सर्वोत्कृट ऑडीओग्राफर , बेस्ट अनिमेशन चित्रपट आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे बक्षीस दिले जाते . पुणे २०१४ चे अध्यक्ष  व संचालक डॉ . जब्बार पटेल उपाध्यक्ष सबिना सांगावी कार्यक्रम संचालक श्रीनिवास सन्थनम हे होते २०१३ मध्ये या महोत्सवाचे काक स्पर्श शिफारशीस आहे . २०१४ मध्ये संत तुकाराम यास बेस्टआंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट  म्हणून  गौरवण्यात आले.


पूजा रामराव डोम